Movies Songs

ओल्या सांजवेळी उन्हे – Olya Sanjveli Marathi Lyrics

By  | 

ओल्या सांजवेळी उन्हे – Olya Sanjveli Marathi Lyrics

ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोर्‍या कागदाची कविता अन्‌ जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना

आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके
सुख हे नवे, सलगी करे, का सांग ना?

सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देऊया

माझी ही आर्जवे पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या

रस्ता नवा शोधू जरा हातात हात दे
पुसुया जुन्या पाऊलखुणा, सोबत तुझी साथ दे

ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोर्‍या कागदाची कविता अन्‌ जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना

वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे

डोळ्यांतल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे

सांभाळ तू माझे मला, माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला

ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोर्‍या कागदाची कविता अन्‌ जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *