Bhakti Geet
रखुमाई रखुमाई – Rakhumai Rakhumai Lyrics – Poshter Girl
रखुमाई रखुमाई – Rakhumai Rakhumai Lyrics | Poshter Girl
तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलना
तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलना
ये ग.. ये ग.. रखुमाई ये भक्तांच्या माहेरी
सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी
ये ग.. ये ग.. रखुमाई ये भक्तांच्या माहेरी
सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी
रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई
तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलना
तू सकलांची आई साताजन्माची पुण्याई
घेई पदरात आम्हावरी छाया धर बाई
तुझी थोरवी महान तिन्हीलोकी तुला मान
देई वरदान होऊ तुझ्या पालखीचे भोई
रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई
रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई
तू कृपेचा कळस आम्ही पायरीचे दास
तरी युगे-युगे उपेक्षाच केली तुझी बाई
तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर
आता करू दे जागर होऊ दे ग उतराई
रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई
रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई
0 comments