Movies Songs

आयुष्य हे चुलीवरल्या कडईतले कांदे पोहे – Kande Pohe Lyrics In Marathi- Sanai chaughade

By  | 

आयुष्य हे चुलीवरल्या कडईतले कांदे पोहे – Kande Pohe Ayushya He Chulivarlya Lyrics

भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी
हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन कांती
आयुष्य हे चुलीवरल्या कडईतले कांदे पोहे…..२

नात्यांच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी
आणि म्हणे तो वरचा ठरवी शत जन्माच्या गाठी
रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी
पाने मिठुनी लाजळूपरी पुन्हा उघडण्यासाठी
आयुष्य हे चुलीवरल्या कडईतले कांदे पोहे…..२

दूर देशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना
कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना……..२

नकळत आपण हरवून जावे स्वतः मग जपताना
अन मग डोळे उघडावे हे दिवसा स्वप्न पाहताना
आयुष्य हे चुलीवरल्या कडईतले कांदे पोहे……

भूत- कालच्या धुवून अक्षता तांदूळ केले ज्यांनी
आणि सजवला खोटा रुखवत भाड्याच्या भाड्यानी…..2

भविष्य आता रंगवण्याचा अट्टाहास हि त्याचा
हातावरल्या मेहंदीवर ओतून लिंबाचे पाणी
आयुष्य हे चुलीवरल्या कडईतले कांदे पोहे…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *