Bhakti Geet

Keshava Madhava lyrics in Marathi – केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा

By  | 

Keshava Madhava lyrics in Marathi – केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा

केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा

तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा

वेडा होऊन भक्तीसाठी, गोपगड्यांसह यमुनाकाठी
नंदाघरच्या गाई हाकिशी गोकुळी यादवा

वीर धनुर्धर पार्थासाठी, चक्र सुदर्शन घेऊन हाती
रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *