Album

Ratris Khel Chale Lyrics – रात्रीस खेळ चाले

By  | 

Ratris Khel Chale Lyrics – रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचाहा चंद्र ना स्वयंभू रवितेज वाहतो हा

ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होय साक्षी हा दूत चांदण्यांचाआभास सावली हा.. असतो खरा प्रकाश

जे सत्य भासती ते असती नितांत भास
फसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचाया साजिर्‍या क्षणाला का आसवे दिठीत

मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या या धुंद जीवनाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *