Movies Songs

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा – Sar Sukhachi Shravani Lyrics

By  | 

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा – Sar Sukhachi Shravani Lyrics

हं… हं…
हं… थांब ना…
हं… हं…
तू कळू दे, थांब ना…

गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे, थांब ना
थांब ना, थांब ना

(सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा)
(गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)

हो, गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे, थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा

सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला

हो, सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
खेळ हा तर कालचा…
खेळ हा तर कालचा, पण आज का वाटे नवा…
कालचा हा खेळ बघ वाटे नवा

(सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा)
(गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)

बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे

हो, बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
वाटतो आता…
वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा…
उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा…

गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना

(सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा)
(गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)
(सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा)
(गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *