आली हासत पहिली रात | Ali hasat pahili rat lyrics in Marathi

Ali hasat pahili rat Lyrics in Marathi

आली हासत पहिली रात
उजळत प्राणांची फुलवात

प्रकाश पडता माझ्यावरती
फुलते बहरून माझे यौवन
हसली नवती चंचल होऊन
नयनांच्या महालात

मोहक सुंदर फूल जिवाचे
पतीचरणावर प्रीत अर्पिता
मीलनाचा स्पर्श होता
विरली अर्धांगात

लाज बावरी मी सावरता
हर्षही माझा बघतो चोरून
भास तयाचा नेतो ओढून
स्वप्‍नाच्या हृदयात

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *