गंगा-जमुना दोघ्या | Ganga-Jamuna Doghya Lyrics in Marathi

गंगा-जमुना दोघ्या | Ganga-Jamuna Doghya Lyrics in Marathi

गंगा-जमुना दोघ्या बयनी गो पानी झुलझुल व्हाय
दर्याकिनारी एक बंगला गो पानी जाय-जुई-जाय

माशांनी मारलाय दणका गो पानी तलाला जाय
कोल्याची पोर एक सोबेची तया उबीच हाय
नेसली पैठण सारी गो पदर वार्‍यानी जाय
अंगान्‌ चोली गजनीची पोरी ठुमकत जाय
नाखवा गेलाय्‌ डोलिला पोरी करशील काय

आंब्याच्या डांगलीवर बसलाय्‌ मोर, नवरीचा बापुस कवटं चोर
करवल्या खुइताना आंब्याच्या डांगल्या म्हायेरा जावालं सांजवलं
आंब्याची डांगली हलविली नवर्‍याने नवरीला पलविली

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *