जीवनाच्या या फुलाला वेदनेचा गंध आहे
गंधवेड्या वेदनेला रेशमाचा बंध आहे
वेदना ही जाळणारी
चंदनाला पोळणारी
चंपकाच्या विंझणाचा तप्त वारा झोंबताहे
चांदण्याचा ताप वाटे
वेदनेचा सूर दाटे
कर्पूराचे कुटील काटे बोचती हे, विरह दाटे
वाट त्याची पाहताहे
पाहताना रंगताहे
अमृताच्या जीवनी या आसवांचा पूर वाहे
गीत | – | सूर्यकान्त खाण्डेकर |
संगीत | – | कमलाकर भागवत |
स्वर | – | भूपेंद्र |
गीत प्रकार | – | भावगीत |