टाकिलेस नाव जरी Lyrics in Marathi

टाकिलेस नाव जरी आठवीन मी तुला
जाळिलेस पंख तरी झेप घ्यायची मला

तो प्रशांत सांध्यमेळ
प्रीतिचा सुरम्य खेळ
जपिन तोच क्षण सुवर्ण
मधुर संगतीतला

प्रीतिकथा घडलेली
जाणतात वनवेली
शोक-अंत वाचुनिया
आसमंत स्फुंदला

चुकवशील जागेपणि
म्हणशिल जा जा इथुनी
स्वप्‍नभेट परि कशी
चुकेल रे तुलामलागीत
संगीत यशवंत देव
स्वर सुमन कल्याणपूर
गीत प्रकार भावगीत

Leave a comment

Your email address will not be published.