टिमक्याची चोली बाय | Timakyachi Choli Baay Lyrics in Marathi

टिमक्याची चोली बाय | Timakyachi Choli Baay Lyrics in Marathi

टिमक्याची चोली बाय रंगान्‌ फुलयली
तुझीमाझी जमली जोरी माझे वसयकरीन बाय गो

वसयकरीन बाय गो वसयकरीन बाय
म्हावर्‍याची टोपली तुझे माथ्यावर हाय गो

वसयकरीन बाय तू उभी बांदावर पदर तुझे खांद्यावर
फुलांचा गजरा डुले माथ्यावर नजर तुझी चांदावर
कोली नवरा बरा गे माय
म्हावरच्या टोपल्या घरा गे बाय

दोन पते दोन पते दे ग मना गोमू दे ग मना
खर्चाला पान-सुपारीला
माहीमचा हलवा हाणिन तुला
नाय खाल्लास तर मारीन तुला
अरे मारशील मारशील कोणाला रे कोणाला
मी जाते गोमूचे लग्‍नाला

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *