ठिपक्यांची रांगोळी Thipkyanchi Rangoli | Title Song Lyrics | Star Pravah
घर हे माझे आनंदाचे
दाराशी सुरेख नक्षी
जोडीत जाती मना मनाला
नात्यांचे हळवे पक्षी
दाराशी सुरेख नक्षी
या वातीला वात मिळुनी आसमंत उजळी
सांगते कथा घराची
ठिपक्यांची रांगोळी माझी ठिपक्यांची रांगोळी
रचून एक एक वीट
बांधले मायेचे घरकुल
होईल दुरावा दूर, टाकता
हसून पुढे पाऊल
दृष्ट घराची काढण्याला
सूर्य ये सकाळी
नांदते सुखात अवधी
ठिपक्यांची रांगोळी माझी ठिपक्यांची रांगोळी