दर्यावरी रं तरली होरी रं | Daryavari Ra Tarali Hori Lyrics in Marathi

दर्यावरी रं तरली होरी रं | Daryavari Ra Tarali Hori Lyrics in Marathi

दर्यावरी रं तरली होरी रं
तुझीमाझी जोरी बरी
साजणा होरीतून जाऊ घरी

पान्यावानी पीरत तुझी
झाला माझा जीव राजी
धावलं मन येड्यापरी
मायेच्या रं घराच्या या वाटंवरी
साजणी आता नको जाऊ दुरी

मासोलीचं डोलं तुझं
जाल्यावानी मन माझं
घावलं परडी भरली
गोमुच्या ग पिरतीच्या या मासोलीनं
साजणा जाऊ नको दुरी

शिडातुनी आयला वारा
होरीला गो नाही थारा
नाखवा घोर नको काळजाला
कोलीवाडा अंगाशी रं आता आयला
साजणी होरीतुनी जाऊ घरी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *