नाचे दर्यात तारू | Nache Daryat Taru Lyrics in Marathi

नाचे दर्यात तारू | Nache Daryat Taru Lyrics in Marathi

नाचे दर्यात तारू थय थय थय
चारी बाजूला तूफान भरलंय

धर जोमानं सावरून शिडाचा दोर
अन्‌ तूफान धरलंय मस्तीला जोर
त्यानं होडीला आपल्या घेरलंय रं
चारी बाजूला तूफान भरलंय

एकीच्या पाठीवर दुसरी,
दुसरीच्यासंगं तिसरीनं आली फेसाळ लाटांची उसळी
थैमान झालंय सुरू,
हे आपल्या तारूला बघतंय धरू
त्याच्या मनातलं इंगित हेरलंय रं
चारी बाजूला तूफान भरलंय

नभात ढग गड्या जमल्यात बघ, ढगात बिजली लपली
वादळी वारं सुटलंय सारं होडी सांभाळून आपली
एका दिलाचं जवान आपण, घेऊया तारूला आपल्या जपून
हाती एकीचं सुकाणु धरलंय रं
चारी बाजूला तूफान भरलंय

तुफानी सुटलंय वारा रं, चारी बाजुंनी तरारं
त्यानं टाकलाय होडीला घेरा
इथं कसलेला नावाडी सारा
एका दमात गाठू किनारा
आज जिवाचं भान आम्हा नुरलंय रं
चारी बाजूला तूफान भरलंय

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *