पूर्ण होउनी स्वातंत्र्याला वर्षे पन्नास
बलिदानाने अमर जाहला आमचा इतिहास
स्वातंत्र्याच्या उजळून ज्योती
काळोखाच्या सरल्या राती
भारतमाता मुक्त जाहली, आला मधुमास
निळ्या चांदण्या नभीं उजळती
भूमातेला गात आरती
रत्नहिर्यांची खाण आमुचा भारत हा देश
पवित्र आम्हा इथली नाती
समानतेची जोडू नाती
वंदन करूया राष्ट्रध्वजाला, भरला उल्लास
गीत | – | |
संगीत | – | भूमानंद बोगम |
स्वर | – | आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | – | स्फूर्ती गीत |