भाळी अर्धचंद्र माथी Lyrics in Marathi

भाळी अर्धचंद्र, माथी शुभ्र गंगा
लिंपीले सर्वांगा चिताभस्म

गळा सर्पमाळा, ल्याला व्याघ्रांबर
शिव तो शंकर सत्य तोचि
शंख शिंगनाद गर्जे शिवगण
पायी भक्तजन ओळंगीती

भोळा सदाशिव पावतो भक्तासी
उद्धरी दीनांसी निलकंठ
हर हर शंकर सांब सदाशिव
सांब सदाशिव त्रिपुरारी

हर हर शंकर सांब सदाशिव


गीत ग. दि. माडगूळकर
संगीत विठ्ठल शिंदे
स्वर विठ्ठल शिंदे
गीत प्रकार भक्तीगीत

Leave a comment

Your email address will not be published.