मेनका भूवरी उतरे Lyrics in Marathi

मेनका भूवरी उतरे
स्वरूपाचे तुटती तारे तुटती तारे

भावना रुपचंद्राची
कामना भूप इंद्राची
उधळीत फुले गर्वाची मदनिका रंजना विहरे

चालते रंगढंगात
चमके वीज अंगात
गरगरा रोमरोमांत फिरविते चांदणे भवरे

बोलते धुंद डोळ्यांत
हासते मंद गालांत
लाजर्‍या लोभरागात प्रणयिनी जादुही पसरे


गीत पी. सावळाराम
संगीत वसंत प्रभु
स्वर सुमन कल्याणपूर
चित्रपट देव जागा आहे
गीत प्रकार चित्रगीत

Leave a comment

Your email address will not be published.