येतो रे येतो सजणा Lyrics in Marathi

येतो रे येतो, सजणा
सवतीचा गंध तुझ्या वसना !

मणिबंधावर कुणी बांधिला?
सैल किती हा गजरा पडला
सराईत तो हात दिसेना

ओळखीचा हा नव्हेच दरवळ
विचार पवना तोही सांगेल
नवथर हा तुज छळितही ना

नेत्र असे का मला टाळती ?
का भिवयांवर असे खेळती ?
भाव चोरटे खेळती छपवित गुन्हा


गीत आरती प्रभू
संगीत नीळकंठ अभ्यंकर
स्वर कीर्ती किल्लेदार
नाटक अभोगी
गीत प्रकार नाट्यसंगीत

Leave a comment

Your email address will not be published.