लाडक्या पुंडलिका भेटी Lyrics in Marathi

लाडक्या पुंडलिका भेटी
थांबला देव वाळवंटीं

मायपित्याची करिता सेवा
पुंडलिका तो कसा दिसावा?
अर्ध्या राती घेत विसावा
जोडपे करी कानगोठी

चुरता चुरता चरण आईचे
भक्त करी तो स्मरण हरीचे
कौतुक पाहत मातृप्रीतीचे
पंढरीराव उभा पाठी

थकली कुजबुज जेव्हा थोडी
पांघरू घाली सुत-पासोडी
करिता किंचित मान वाकडी
पाहिला श्रीवर जगजेठी

“देवा, येथुन उठू कसा रे?
जागी होतिल मातापितरे”
शब्दांविण हे सांगुन सारे
फेकली वीट हरीसाठी

Leave a comment

Your email address will not be published.