सांग पत्रिके,
निरोप माझा माय-पितयाला
चालली लेक लग्नाला
देवक पुजिले या प्रतिमांचे
तीर्थ घेतले मी आसवांचे
काय मुलीने मागायाचे?
आशिर्वच द्या एकुलतीला
नाही मळवट, नाही चुडाही
मंगल सनई वाजत नाही
कशी तुला तर नेऊ भाई?
झाली घाई शुभ-घटिकेला
दारी तुझ्या मी बांधुन तोरण
तुलाच देवा, देत निमंत्रण
तुलाच केवळ साक्षी ठेवून
वरिते वधु ही पति-देवाला
गीत | – | पी. सावळाराम |
संगीत | – | वसंत प्रभु |
स्वर | – | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | – | देव जागा आहे |
गीत प्रकार | – | चित्रगीत |