हरी अधरी धरी मुरली Lyrics in Marathi

हरी अधरी, धरी मुरली
निनादत नाद कुंजवनी
मधुर मधुमास, पुरवी आस
रचिला रास गोपांनी

टिपरी वाजे, झांज वाजे, वाजतो मृदंग
नाचे तन, नाचे मन, नाचे अंतरंग
छन छननन छन छननन ताल पैंजणांतुनी
रचिला रास गोपांनी

लखलखती भवताली रम्य दीपज्योती
वदनांवर सर्वांच्या आगळीच कांती
नाचते राधिका देहभान हरपुनी
रचिला रास गोपांनी

Leave a comment

Your email address will not be published.