हे मन कधी पाखरू Lyrics in Marathi

हे मन कधी स्वैर वारा
नि अवचित बरसत्या धारा
हे कधी घरटे उन्हाचे
नि कधीतरी शून्य हा पारा
केव्हातरी पायास भोवरा
केव्हातरी लावून चेहरा
बंदिस्त जगते जरा
हे मन कधी पाखरू, कधी पिंजरा

लाटा क्षणीं धुंद लाटा
वाटा क्षणीं मूक वाटा
ओठी कधी खिन्‍न गाणे
अन्‌ केव्हा सुखाचे तराणे
घडीभराचे रंग ओले
घडीभराचा खेळ चाले
फिरून येई पान गळती
फिरून आले बहर गेले
झंकारता भरती ही कधी
खंतावता ओहोटी कधी
वादळ कधी आसरा
हे मन कधी पाखरू, कधी पिंजरा

हाका नभा देई हाका
झोका झुले उंच झोका
केव्हा पाहे खोल जाया
लावी धरतीस माया
कधी स्वत:च्या भोवताली
कधी जगाच्या भोवताली
लहर याची देह ल्याली
गूढ याच्या हालचाली
काळोखही बोलावे कधी
किरणांकडे झेपावे कधी
झिडकारुनी उंबरा
हे मन कधी पाखरू, कधी पिंजरा

Leave a comment

Your email address will not be published.