Avdhut Chintan Shri Gurudev Datta In Marathi Lyrics

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Avdhut Chintan Shri Gurudev Datta In Marathi Lyrics

ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् ।।

एकं नित्यं विमलमचलं सर्वंधीःसाक्षिभूतम् । भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरुं तं नमामि ॥ १ ॥

काषायवस्त्रं करदंडधारिणं । कमंडलुं पद्मकरेण शंखंम् ।

चंक्रं गदाभूषितभूषणाढ्यं । श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २ ॥

औंदुंबरः कल्पवृक्षः कामधेनुश्च संगमः चिंतामणिर्गुरोः पादौ दुर्लभं भुवनत्रये ॥ ३ ॥

कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनंदन: । द्वापारे रामकृष्णश्च कलौ श्रीपाद श्रीवल्लभ: ॥ ४ ॥

॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥

श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारी तारी मजला ॥ दयाळा तारि तारि मजला ॥

श्रमलो मी या प्रपंचधामीं आलो शरण तुला ॥ धृ० ॥

करितां आटाआटी प्रपंच अवघा दिसतो मिथ्यत्व ।

दयाळा दिसतो मिथ्यत्व म्हणवूनी भजन तुझे मज देवा भासे सत्यत्व ॥

श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारि तारि मजला ॥ दयाळा तारि तारि मजला ॥

श्रमलो मी या प्रपंचधामी आलो शरण तुला ॥

किंचित्मात्र कृपा जरिं मजवरि करिसी उदार मन । दयाळा करिसी उदार मन ॥

चुकलो मी या विषय सुखाच्या आहारांतुनि जाण ॥

श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारि तारि मजला ॥ दयाळा तारि तारि मजला ॥

श्रमलो मी या प्रपंचधामी आलो शरण तुला ॥

कृष्णातटनिकटीं जो विलसे औदुंबरछायीं दयाळा औदुंबरछायीं ॥ हंस परात्पर भारतीनायक लीन तुझे पायीं ॥

श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारि तारि मजला ॥ दयाळा तारि तारि मजला ॥

श्रमलो मी या प्रपंचधामी आलो शरण तुला ॥

भलत्या मिषेंही दत्तनाम घेतां

फल येई हातां सत्य सत्य ॥ १ ॥

श्रुती स्मृती गाती पुराणें वदती

दत्तनामकीर्ती साधु संत ॥ २ ॥

तीर्थ प्रायश्चित्त न करी पुनीत

ज्या तोही पुनीत दत्तनामें ॥ ३ ॥

नामाविना कर्म सांग नोहे धर्म

नाम घेतां शर्म आदीं अंतीं ॥ ४ ॥

वदतां वासुदेव पितर ऋषिदेव

तृप्त होती सर्व दत्तनामें ॥ ५ ॥

( परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त पद )

श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा ॥ वासुदेवानंद सरस्वती सदगुरु नाथा कृपा करा ॥

श्री नारायण महाराज कृत पद :

बांधिला कोप मुरडुनी जाटामुगुटीं । घातली दया वनमाला दिव्य कंठीं ॥

करधृत डमरुंतुनी उपजति ज्ञानकला । गुरुदत्तराज ऋषिकुळीं अवतरला ॥ १ ॥

मृगचर्म पांघरीं शंखचक्र हातीं । श्रुति श्वानरूप होऊनी पुढें पळती ।

भूधेनु कलिभयें चाटित चरणांला ॥ २ ॥

करि स्वजन उपाधि भस्मलेप अंगा । झोळींत भारी तज्जन्म-मरण पिंगा ।

नारायण हृदयीं रंग भरूनि गेला ॥ ३ ॥
॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥

 

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment