Ishare he Marathi song lyrics
तू बोल होतील सारे वेडे उनाड वारे
आडून माझ्या तुला ते देतील जे इशारे
इशारे हे एकदा तू ऐक ना
बहाणे तू हि जरासे सांग ना
झुला आज बांधीन मी विणूनिया वाटांना
वर साज देईन मी पांघरुनी लाटांना
एक झोका मी हि देतो तू हि एकदा दे ना तो
हात लावूया चल त्या नभा
इशारे हे या नभाचे ऐक ना
बहाणे तू हि जरासे सांग ना
बोल ना तू ओढेन मी शाल सांज रातीची
सोबतीस ओवेन हि गाज या पावसाची
ये मिठीत तू जराशी थेंब माळले नभाशी
झेलू आसवे ही ये जरा
इशारे हे आसवांचे ऐक ना
बहाणे तू हि जरासे सांग ना