Kaakan reprise lyrics in Marathi | अन पूर्ण आज झाले काकण – Raman Mahadevan, Neha Rajpal Lyrics

Kaakan reprise song lyrics in Marathi

सुटताना हात , विझताना वाट ,
वाटे आता तो काही परतून यावा ,
घडले जे सारे ते उधाण वारे ,
फिरुनी पुन्हा तो नवस डाव मांडावा ,
खोदून काळाच्या खुणा ,
जगायचे आहे पुन्हा ,
अधुरे स्वप्न साजिरे पुरे करायचे मन ,
पुसुनी असावे आता ,
नवी लिहायची कथा ,
नवासा द्यायचाय अर्थ जीवना,
तुझ्या सावलीत माझे क्षण क्षण ,
अन पूर्ण आज झाले काकण …!!
भेटीला आणि ती जुनी कहाणी आठवू दोघे पुन्हा ,
लाटांची गाणी ती माझी निशाणी नपुनी आहेस ना ,
बेरंग झालेले आयुष्य सारे रंगवू थोडे पुन्हा ,
पहाट सारली नि रातीही गेल्या वाट पाहण्यात त्या ,
माझ्या जगातून आले मी परतून जायचे आहे पुन्हा ,
प्रेमात हरले मी तुझे आयुष्य आहे हा माझा गुन्हा ,
चल झाली वेळ ,
आटोपून खेळ
सोडून हात सारा प्रवास हा एकट्याचा ,
दिले शब्द शब्द जे जे ,
पुरे केले ते ते ,
आहे सुखात तरी हि मनात हि व्यथा का ,
खोदून काळाच्या खुणा ,
जगायचे आहे पुन्हा ,
अधुरे स्वप्न साजिरे पुरे करायचे मना ,
पुसुनी असावे आता ,
नवी लिहायची कथा ,
नवासा द्यायचाय अर्थ जीवना ,
आले आता सुखाचे क्षण क्षण ,
अन पूर्ण आज झाले काकण .!!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *