Kheltana rang bai holicha song lyrics खेळताना रंग बाई होळीचा होळीचा

Kheltana rang bai holicha song lyrics खेळताना रंग बाई होळीचा होळीचा

खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

आम्ही तरण्या ग पोरी ,जमलो गावा बाहेरी
सख्याची आली स्वारी ,उडविली ती पिचकारी
घातला ग घेरा त्यानं टोळीचा, टोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

झणि पाऊल अवघडलं ,आणि काळीज धडधडलं
काय सांगु मी पुढलं ,क्षणातच सारं घडलं
जीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

मला काहि समजंना, मला काही उमजंना
त्याला कोणी सांगंना, कुणाला तो ऐकंना
डाव साधला ऐनवेळीचा, वेळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा

Leave a comment

Your email address will not be published.