Mandila Jata Go Lyrics in Marathi

Mandila Jata Go Lyrics in Marathi

मांडीला जाता गो चाऊल दलायला
आणीला वाट गो हळद वाटायला

अनिकेत नवरा पाटावर बसला
हळदीचे दिसाला

कुंकवाचा टिळा लावा त्या नवऱ्याला
टील्यावर लाविला चाऊल
शोभा त्या चावलाला

मंडवाचे दारी आज उंबर बांधिला
पाच जनी बहिणी आल्या गो पोकायला

केळणीचा खांब लावूनी मांडव सजविला
अनिकेत नवरा पाटावर बसला हळदीचे दिसाला

पहिला मान दिला कुळाचे कुलदेवाला
मान काय दिला माझे घरचे खंडू देवाला

अनिकेत नवरा बसला पाटावरी
आई माऊलीचा हातू त्याच्या पाठीवरी

अनिकेत दादाची हळद गाजतेय आज गावाला
अनिकेत नवरा पाटावर बसला हळदीचे दिसाला

अनिकेत नवरा बसला मांडव दाराला
कल्याच गो पाणी आणा नान्हायला

काकान बांधला बोलव त्या मामाला
गोड काय भरवते मामी गो भाच्याला

परमेश माळी गातोय धावला
आज या मांडव दाराला
अनिकेत नवरा पाटावर बसला हळदीचे दिसाला

Leave a comment

Your email address will not be published.