युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा| Yuga Yuganche Nate Apule Lyrics in Marathi

Yuga Yuganche Nate Apule Lyrics in Marathi

युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा
सहवासाची ओढ निरंतर, नको दुरावा

भासे सारे सुने तुझ्याविण
तुझ्याचसाठी आसुसले मन
तोडून बेड्या सर्व जगाच्या
कधी आपुले होईल मिलन
उनसावल्या झेलत हासत जन्म सरावा

जो तो आहे ज्याचा त्याचा
परके झाले सारे जीवलग
देह दोन परि एकच आत्मा
कुणा कळावी अपुली तगमग
एकच आशा, शेवटचा दिस गोड करावा

Leave a comment

Your email address will not be published.