Movies Songs
अश्विनी ये ना , प्रिये, जगू- Ashwini ye na Lyrics in Marathi
अश्विनी ये ना – Ashwini ye na Lyrics in Marathi
अश्विनी ये ना !
प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी ग
कशी ही जिंदगीत अणीबाणी ग
ये ना प्रिये !
मी तर प्रेम दिवाणा रसिला
दे प्यार जरासा नशिला
प्रिया, उगाच संशयात मी बुडाले रे
तुला छळून मी जळून गेले रे
ये साजणा !
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे
मंद धुंद ही गुलाबी हवा
प्रीत गंध हा शराबी नवा
हात हा तुझाच हाती हवा
झोंबतो तनूस हा गारवा
तुझीमाझी प्रीती अशी फुले मधुराणी
फुलातुनी उमलती जशी गोड गाणी
तू ये ना, तू ये ना
ना ना ना !
ये अशी मिठीत ये साजणी
पावसात प्रीतिच्या न्हाउनी
स्वप्न आज जागले लोचनी
अंगअंग मोहरे लाजुनी
जाऊ नको दूर आता मन फुलवुनी
तूच माझा राजा अन् मीच तुझी राणी
तू ये ना, तू ये ना
तू ये ये ये
0 comments