Kaakan Lyrics in Marathi

Kaakan Lyrics in Marathi

जगण्याची आशा.. या मनाची भाषा..
तू न बोलता न ऐकता समजून घे ना..
स्वप्नांचे रंग.. मी तुझ्यात दंग..
उरे बाकी काय तुझी साथ संग असताना..
आकाशी चंद्र चांदण्या.. तोडून मी का आणल्या..
मनाचा पाळणा करू.. बांधुनी घे जरा झूला..
डोळ्यात तूच साजणी.. सुखाचा स्पर्श तू नवा..
तुझ्या वीना उरे न अर्थ जीवना..
उजळे तुझ्या हसुने कण कण..
अन चंद्र हे हातीचे काकण..
भेटीला आणि तू नवी कहाणी माळून श्वासात ये..
लाटांची गाणी ती तुझी निशाणी मनात माझ्या उरे..
रंगवुनी टाक आयुष्य माझे सुर तुझे साद दे..
पहाट ओली ती तुझ्या उषाशी.. रातीला आवाज दे..
येइन आता मी उराशी आशाही जाण्याची वेळ नको..
ओढ़ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी खेळ नको..
तू अशीच ये ना.. नी मिठीत घे ना..
जग धुंद धुंद नको पाश बंध कुठलाच आता..
दे हातात हात.. जरी दूर वाट..
भीति नाही आज.. तुझी संग साथ असताना..
आकाशी चंद्र चांदण्या.. तोडून मी का आणल्या..
मनाचा पाळणा करू.. बांधुनी घे जरा झूला..
डोळ्यात तूच साजणी.. सुखाचा स्पर्श तू नवा..
तुझ्या वीना उरे न अर्थ जीवना..
उजळे तुझ्या हसुने कण कण..
अन चंद्र हे हातीचे काकण..

09HNx1NIwdAc

Leave a Comment