Kalya Matit Matit Lyrics in Marathi – काळ्या मातीत मातीत

Kalya Matit Matit Lyrics in Marathi – काळ्या मातीत मातीत

काळ्या मातीत मातीत तिफन चालते,

तिफन चालते,तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो,
ढोल वाजवितो,ढग ढोल वाजवितो

काळ्या मातीत मातीत तिफन चालते,
तिफन चालते,तिफन चालते

सदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला

संग पारवती चाले ओटी बांधून पोटाला
सरीवर सरी येती माती न्हाती धुती होते
कस्तुरीच्या सुवासानं भूल जिवाला पडते
भूल जिवाला पडते वाट राघूची पाहते
राघू तिफन हाकतो मैना वाटुली पाहते
काळ्या मातीत मातीत तिफन चालते,
तिफन चालते,तिफन चालते

सर्जा रं माझ्या ढवळ्या रं

माझ्या पवळ्या रं माझ्या आss हाss

चालं ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ

लोनी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं
काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो
डोळा सपान पाहतो काटा पायांत रुततो
काटा पायांत रुतताsss होss
काटा पायांत रुतता लाल रगात सांडतं
लाल रगात सांडतं हिरवं सपान फुलतं

काळ्या मातीत मातीत तिफन चालते,

तिफन चालते,तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो,

ढोल वाजवितो,ढग ढोल वाजवितो
काळ्या मातीत मातीत तिफन चालते,

तिफन चालते,तिफन चालते
तिफन चालते,तिफन चालते
तिफन चालते,तिफन चालते

0watch?v=J4m2y42X2s4

Leave a Comment