अजि मी ब्रह्म पाहिले संत अमृतराय महाराज अभंगवाणी Lyrics in Marathi

अजि मी ब्रह्म पाहिले संत अमृतराय महाराज अभंगवाणी Lyrics in Marathi

अजि मी ब्रह्म पाहिले

अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी
कटिकर नटसम चरण विटेवरी, उभे राहिले

एकनाथाच्या भक्तिसाठी, धावत आला तो जगजेठी
खांदी कावड आवड मोठी, पाणी वाहिले

चोख्यासंगे ढोरे ओढिता, शिणला नाही तो तत्त्वतां
जनीसंगे दळिता कांडिता, गाणे गाईले

दामाजीची रसिद पटवली, कान्होपात्रा ती उद्धरिली
अमृतराय ह्मणे ऐसी माउली, संकटा वारिले

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *