देह शुद्ध करुनी – Sant Janardan Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi

देह शुद्ध करुनी – Sant Janardan Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi देह शुद्ध करुनी भजनीं भजावे । आणिकाचें नाठवावें दोषगुण ॥१॥ साधनें समाधी नको पां उपाधि । सर्व समबुद्धी करी मन ॥२॥ ह्मणे जनार्दन घेई अनुताप । सांडी पां संकल्प एकनाथा ॥३॥

सुखाचें हें नाम आवडीनें – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

सुखाचें हें नाम आवडीनें – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi सुखाचें हें नाम आवडीनें गावें । वाचे आळवावें विठोबासी ॥१॥ संसार सुखाचा होईल निर्धार नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥ कामक्रोधांचें न चलेचि कांहीं । आशा मनशा पाहीं दूर होती ॥३॥ आवडी धरोनी वाचें ह्मणे हरिहरि । ह्मणतसे महारी चोखियाची ॥४॥

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं । पुंडलिकापाठीं उभें ठाकें ॥१॥ साजिरें गोजिरें समचरणीं उभें । भक्ताचिया लोभें विटेवरी ॥२॥ कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले । शंख चक्र मिरवले गदापद्म ॥३॥ चोखा ह्मणे शोभे वैजयंती कंठी । चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥

सुख अनुपम संतांचे – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

सुख अनुपम संतांचे – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे ॥१॥ तो हा महाराज ज्ञानेश्वर माउली । जेणें निगमावली प्रगट केली ॥२॥ संसारी आसक्त माया-मोह रत । ऐसे जे पतीत तारावया ॥३॥ चोखा ह्मणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ जीव होती ॥४॥

विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi विठ्ठल विठ्ठल गजरी । अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥ होतो नामाचा गजर । दिंड्या पताकांचा भार ॥२॥ निवृत्ती ज्ञानदेव सोपान । अपार वैष्णव ते जाण ॥३॥ हरि कीर्तनाची दाटी । तेथें चोखा घाली मिठी ॥४॥

पंढरीचे सुख नाहीं – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

पंढरीचे सुख नाहीं – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे ॥१॥ त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ । दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥ सकळ संतांचा मुकुटमणी देखा । पुंडलिक सखा आहे जेथें ॥३॥ चोखा ह्मणे तेथें सुखाची मिराशी । भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥

धांव घाली विठू आतां – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

धांव घाली विठू आतां – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi धांव घाली विठू आतां चालूं नको मंद । बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध ॥१॥ विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला । शिव्या देती ह्मणती महारा देव बाटविला ॥२॥ जोडुनियां कर चोखा विनवितो देवा । बोलिला उत्तरीं परि राग नसावा ॥४॥

जोहार मायबाप जोहार – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

जोहार मायबाप जोहार – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ॥१॥ बहु भुकेला झालों । तुमच्या उष्ट्यासाठीं आलों ॥२॥ चोखा ह्मणे पाटी । आणिली तुमच्या उष्ट्यासाठीं ॥३॥

आह्मां नकळे ज्ञान – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

आह्मां नकळे ज्ञान – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi आह्मां नकळे ज्ञान न कळे पुराण । वेदाचें वचन नकळे आह्मां ॥१॥ आगमाची आढी निगमाचा भेद । शास्‍त्रांचा संवाद न कळे आह्मां ॥२॥ योग याग तप अष्टांग साधन । नकळेची दान व्रत तप ॥३॥ चोखा ह्मणे माझा भोळा भाव देवा । गाईन केशवा नाम… Continue reading आह्मां नकळे ज्ञान – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

निर्गुणाचे भेटी आलो – Sant Gora Kumbhar अभंगवाणी Lyrics in Marathi

निर्गुणाचे भेटी आलो – Sant Gora Kumbhar अभंगवाणी Lyrics in Marathi निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे । तंव झालों प्रसंगी गुणातीत ॥१॥ मज रूप नाहीं, नांव सांगू काई । झाला बाई काई बोलूं नये ॥२॥ बोलतां आपली जिव्हा पैं खादली । खेचरी लागली पाहतां पाहतां ॥३॥ ह्मणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी । सुखासुखी मिठी पडली… Continue reading निर्गुणाचे भेटी आलो – Sant Gora Kumbhar अभंगवाणी Lyrics in Marathi