जय शारदे वागीश्वरी Jai Sharde Vagishwari Lyrics

जय शारदे वागीश्वरी Jai Sharde Vagishwari Lyrics

जय शारदे वागीश्वरी
विधिकन्यके विद्याधरी

ज्योत्‍स्‍नेपरी कांती तुझी
मुख रम्य शारद चंद्रमा
उजळे तुझ्या हास्यातुनी
चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे
नित्‌ वर्षु दे अमुच्या शिरी

वीणेवरी फिरता तुझी
चतुरा कलामय अंगुली
संगीत जन्मा ये नवे
जडता मतीची भंगली
उन्मेष कल्पतरूवरी
बहरून आल्या मंजिरी

Leave a comment

Your email address will not be published.