Aavadate Bari Mala Maze Ajoba Lyrics – आवडते भारी मला माझे आजोबा

Aavadate Bari Mala Maze Ajoba Lyrics – आवडते भारी मला माझे आजोबा

आवडते भारी मला माझे आजोबा !

पाय त्यांचे थकलेले
गुडघ्यांत वाकलेले
केस सारे पिकलेले
ओटीवर गीत गाती माझे आजोबा !

नातवंडा बोलवून
घोगऱ्याशा आवाजानं
सांगाती ग रामायण
मोबदला ‘पापा घेती माझे आजोबा !

रागेजता बाबा आई
आजोबांना माया येई
जवळी ते घेती बाई
कुटलेला विडा देती माझे आजोबा!

खोडी करी खोडकर
आजोबांची शिक्षा थोर
उन्हाध्ये त्यांचे घर
पोरासंगे पोर होती माझे आजोबा !

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *