माझें माहेर पंढरी – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

माझें माहेर पंढरी – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi माझें माहेर पंढरी । आहे भीवरेच्या तीरीं ॥१॥ बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥ पुंडलिक आहे बंधू । त्याची ख्याती काय सांगूं [१] ॥३॥ माझी बहीण चंद्रभागा । करीतसे पाप भंगा ॥४॥ एका जनार्दनीं शरण । करी माहेरची आठवण ॥५॥

भाव तोंचि देव- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

भाव तोंचि देव- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi भाव तोंचि देव भाव तोंचि देव । ये अर्थी संदेह धरूं नका ॥१॥ भाव भक्ति फळे भावें देव मिळे । निजभावें सोहाळे स्वानंदाचे ॥२॥ भावचि कारण भावचि कारण । यापरतें साधन नाहीं नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं भावाच्या आवडी । मनोरथ कोडी पुरती तेथें ॥४॥

नको वाजवू श्रीहरी मुरली – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

नको वाजवू श्रीहरी मुरली – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi नको वाजवू श्रीहरी मुरली तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे खुंटला वायुचा वेग, वर्षती मेघ जल स्थिरावली घागर घेऊन पाणियासी जाता डोईवर घागर पाझरली एका जनार्दनी पूर्ण कृपेने राधा गौळण घाबरली

देवासी तो पुरे एक – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

देवासी तो पुरे एक – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi देवासी तो पुरे एक प्रेमभाव । पूजा अर्चा वाव सर्व जाणा ॥१॥ मनापासूनियां करितां कीर्तन । आनंदें नर्तन गातां गीत ॥२॥ रामकृष्णहरि उच्चार सर्वदा । कळिकाळ बाधा तेणें नोहे ॥३॥ एका जनार्दनीं हाचि पैं विश्वास । सर्वभावें दास होईन त्याचा ॥४॥

दादला नको ग बाई – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

दादला नको ग बाई – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi बया बया बया ! काय झालं बया? दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई ! मोडकंच घर, तुटकंच छप्पर पन र्‍हायाला जागा नाही मला दादला नको ग बाई ! फाटकंच लुगडं, तुटकीच चोळी पन शिवायला दोरा न्हाई मला दादला नको ग बाई … Read more

जया म्हणती नीचवर्ण- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

जया म्हणती नीचवर्ण- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi जया म्हणती नीचवर्ण । स्‍त्रीशुद्रादी हीनजन ॥१॥ सर्वांभूतीं देव वसे । नीचा ठायीं काय नसे ॥२॥ नीच कोठोनि जन्मला । पंचभूतां वेगळा जाला ॥३॥ तया नाहीं कां जनन । सवेंचि होत पतन ॥४॥ नीच म्हणोनि काय भुलीं । एका जनार्दनीं देखिली ॥५॥

गुरु परमात्मा परेशु – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

गुरु परमात्मा परेशु – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥ देव तयाचा अंकिला । स्वयें संचरा त्याचे घरा ॥२॥ एका जनार्दनीं गुरुदेव । येथें नाहीं बा संशय ॥३॥

खांद्यावरी घोंगडी हातामध्ये – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

खांद्यावरी घोंगडी हातामध्ये – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी । घेउनिया चारीतसे धेनु सांवळा ॥१॥ राधे तुझा मुकुंद मुरारी । वाजवि वेणू नानापरि ॥२॥ सकळ तीर्थें ज्याच्या चरणांवरी लोळती । तो ह्मणे राधिकेसी करीन मी तुझी वेणीफणी ॥३॥ एका जनार्दनीं रचिलें रासमंडळ । जिकडे पाहें तिकडे अवघें ब्रह्म कोंदलें ॥४॥

कुणीतरी सांगा गे – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

कुणीतरी सांगा गे – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi कुणीतरी सांगा गे । माझा कृष्ण देखिला काय ॥१॥ हाती घेउनिया फूल । अंगणीं रांगत आलें मूल । होतें सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥२॥ माथां शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण । त्याला ह्मणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती ॥३॥ एका जनार्दनीं … Read more

काया ही पंढरी आत्मा हा – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

काया ही पंढरी आत्मा हा – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥ भाव-भक्ति भीमा उदक तें वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥ दया-क्षमा-शांति हें चि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥ ज्ञान-ध्यान-पूजा विवेक आनंद । हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥ दश इंद्रियांचा एक मेळ केला … Read more