ॐकारस्वरूपा सद्गुरू – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

ॐकारस्वरूपा सद्गुरू – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi ॐकारस्वरूपा सद्गुरू समर्था । अनाथाच्या नाथा तुज नमो ॥१॥ नमो मायबापा गुरुकृपाघना । तोडी या बंधना मायामोहा ॥२॥ मोहोजाळ माझें कोण निरशील । तुजवीण दयाळा सद्गुरुराया ॥३॥ सद्गुरुराया माझा आनंदसागर । त्रैलोक्या आधार गुरुराव ॥४॥ गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश । ज्यापुढें उदास चंद्र-रवि ॥५॥ रवि शशि … Read more

सत्वर पाव ग मला- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

सत्वर पाव ग मला- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi सत्वर पाव ग मला । भवानीआई रोडगा वाहीन तुला ॥१॥ सासरा माझा गांवी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥ सासू माझी जाच करिते । लवकर नेई ग [१] तिला ॥३॥ जाऊ माझी फडफड बोलति । बोडकी कर ग तिला ॥४॥ नणंदेचें कारटं [२] किरकिर करितें … Read more

विंचू चावला- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

विंचू चावला- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार अग, ग.. विंचू चावला देवा रे देवा.. विंचू चावला आता काय मी करू.. विंचू चावला अरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू चावला, हो महाराज, महाराज काय झाले काय एकाएकी? काम, क्रोध विंचू चावला तम … Read more

विठ्ठलावांचुनी आणिकाचें- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

विठ्ठलावांचुनी आणिकाचें- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi विठ्ठलावांचुनीं आणिकाचें ध्यान । नाहीं आह्मां चिंतन दुजियाचें ॥१॥ आमुचे कुळीचें विठ्ठल दैवत । कुळधर्म समस्त विठ्ठल देव ॥२॥ विठ्ठलावांचुनीं नेणों क्रियाकर्म । विठठलावांचुनीं धर्म दुजा नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठल भरला । भरुनीं उरला पंढरीये ॥४॥

वारियाने कुंडल हाले- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

वारियाने कुंडल हाले- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi वारियाने कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले ॥१॥ राधा पाहून भुलले हरी । बैल दुभवी नंदाघरी ॥२॥ फणस जंबीर कर्दळी दाटा । हाति घेऊन नारंगी फाटा ॥३॥ हरि पाहून भुलली चित्ता । राधा घुसळी डेरा रिता ॥४॥ ऐसी आवडी मिनली दोघां । एकरूप झाले अंगा … Read more

रूपें सुंदर सांवळा गे माये – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

रूपें सुंदर सांवळा गे माये – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi रूपें सुंदर सांवळा गे माये । वेणु वाजवी वृंदावना गोधनें चारिताहे ॥१॥ रुणझुण रुणझुण वाजवी वेणु । वेधीं वेधलें आमुचें तनमनु वो माये ॥२॥ गोधनें चारी हातीं घेऊनि काठी । वैकुंठीचा सुकुमार गोपवेषें जगजेठी ॥३॥ एका जनार्दनीं भुलवी गौळणी । करिती तनुमनाची वोवाळणी … Read more

रामनाम ज्याचे मुखी – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

रामनाम ज्याचे मुखी – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi रामनाम ज्याचे मुखीं । तो नर धन्य तिनीं लोकीं ॥१॥ रामनाम वदतां वाचें । ब्रह्मसुख तेथें नाचे ॥२॥ रामनामें वाजे टाळी । महादोषां होय होळी ॥३॥ रामनाम सदा गर्जें । कळिकाळ भय पाविजें ॥४॥ ऐसा रामनामीं भाव । तया संसाराचि वाव ॥५॥ आवडीनें नाम गाय … Read more

येथोनि आनंदु रे – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

येथोनि आनंदु रे – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi येथोनि आनंदु रे । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥ महाराजाचे राउळीं । वाजे ब्रह्मानंद टाळी ॥२॥ लक्ष्मी चतुर्भुज जाली । प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥ एका जनार्दनीं नाम । पाहतां मिळे आत्माराम ॥४॥

या पंढरीचें सुख – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

या पंढरीचें सुख – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi या पंढरीचें सुख पाहतां डोळां । उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥ ह्मणोनियां मन वेधलें चरणीं । आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥ जनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं । करी वोवाळणी शरीराची ॥३॥

माझ्या मना लागो छंद- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

माझ्या मना लागो छंद- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi माझ्या मना लागो छंद । गोविंद, नित्य गोविंद ॥१॥ तेणें देह ब्रह्मरूप गोविंद । निरसेल नामरूप, गोविंद ॥२॥ तुटेल सकळ उपाधि । निरसेल आधि-व्याधी, गोविंद ॥३॥ गोविंद हा जनीं-वनीं । ह्मणे एका जनार्दनीं ॥४॥