Galyat Majhya Tuch Lyrics in Marathi

Galyat Majhya Tuch Lyrics in Marathi

 
गळ्यात माझ्या तूच जिवलगा मंगलमणी बांधले
जन्मोजन्मीची सुवासीन मी तुझ्यामुळे जाहले

दिसायला मी काळीसावळी, मुलखाची लाजरी
नटणे सजणे या भोळीला ठाऊक नसता परि
तव नयनांचा पाऊस अवचित पडला अंगावरी
वठल्या देही चैत्रपालवी, कणकण मोहरले

प्रीतीची तव खातर होऊन तुझ्याकडे धावले
जनरूढीच्या लोहशृंखला झाली जड पाऊले
कुचाळकीची आग पसरुनी उठता ही वादळे
हात देउनी तूच राजसा, फुलापरी झेलले

पाचूचा हा चुडा भरुनिया तुजभवती नाचले
आनंदाचे अश्रू उधळित सप्तपदी चालले
तूच दयाळा सौभाग्याचे लेणे मज अर्पिले
अभागिनीच्या कुंकू कपाळी सख्या तूवा लाविले

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *