Kadhi Tu Disashil Lyrics in Marathi

Kadhi Tu Disashil Lyrics in Marathi

कधी तू दिसशील डोळ्यांपुढे
तुझ्यावाचून सुचे न काही वेड जिवाला जडे

स्वप्‍नी येसी जवळ बैसशी
स्पर्शभास तो तुझा तनुशी
एकान्‍तीही मधूर स्वर तुझा अवचित कानी पडे

उपभोगाविण अवीट माधुरी
उठवी ओलसर रेखा अधरी
तव श्वासांच्या गंधास्तव पण श्वासच माझा अडे

आसुसली तनू आलिंगनासी
मधुमीलन हा ध्यास मनासी
चिरवांच्‍छीत हा योग सुमंगल का नच अजुनी घडे

Leave a comment

Your email address will not be published.