movie songs

रंगूनी रंगात सार्‍या – Ranguni Rangat Sarya Lyrics in Marathi

By  | 

रंगूनी रंगात सार्‍या – Ranguni Rangat Sarya Lyrics in Marathi

रंगूनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा
गुंतूनी गुंत्यात सार्‍या, पाय माझा मोकळा

भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो
अन्‌ कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्याच्या कळा
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन्‌ कुठे आयुष्य गेले, कापुनी माझा गळा

सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा
चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *