Runanubandhachya Lyrics in Marathi – ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी

Runanubandhachya Lyrics in Marathi – ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी
भेटींत तृष्टता मोठी

त्या कातरवेळा थरथरती कधिं अधरीं
त्या तिन्हीसांजा, त्या आठवणी, त्या प्रहरीं
कितिदां आलो, गेलो, जमलो
रुसण्यावाचुनी परस्परांच्या कधीं न घडल्या गोष्टी

कधी तिने मनोरम रुसणें, रुसण्यात उगिच ते हंसणे
म्हणून ते मनोहर रुसणें, हंसणे रुसणें – रुसणें हंसणे
हसण्यांवरती रुसण्यांसाठी, जन्मजन्मीच्या गाठी

कधी जवळ सुखाने बसलो, दुःखांत सुखाला हसलो
कधी गहिवरलो, कधी धुसफुसलो
सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा
जन्मासाठी जन्म जन्मलो
जन्मांत जमली न गट्टी

Leave a comment

Your email address will not be published.