Shri Gajanan Maharaj Ashtak – श्री गजानन महाराज अष्टक (दासगणूकृत)

Shri Gajanan Maharaj Ashtak – श्री गजानन महाराज अष्टक (दासगणूकृत)

गजानना गुणागरा परम मंगला पावना ।
अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।।
नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।।

निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करी ।
तुझी पतितपावना भटकलो वृथा भूवरी ।
विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वांसरा ।
करी पदनातावरी बहु दया न रोषा धरा ।।२।।

अलास जगीं लावण्या परतुनी सु-वाटे जन ।
समर्थ गुरूराज ज्या भुषवि नाम नारायण ।।
म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनिया करा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।३।।

क्षणांत जल आणिले नसून थेंब त्या वापिला ।
क्षणांत गमनाप्रती करिसि इच्छिलेल्या स्थळा ।
क्षणांत स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।४।।

अगाध करणी तुझी गुरूवरा, न लोकां कळे।
तुला त्यजुनी व्यर्थ ते आचरितात नाना खुळे ।
कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।५।।

समर्थ स्वरूपप्रती धरून साच बाळापूरी ।
तुम्ही प्रगट जाहलां सुशिल बाळकृष्णा घरी ।
हरिस्वरूप घेऊनि दिधली भेट भीमातिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।६।।

सछिद्र नौकेप्रती त्वदिय पाय हे लागतां ।
जलांत बुडतां तरी तिजसी नर्मदा दे हाता ।
अशा तुजसि वाणण्या नच समर्थ माझी गिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।७।।

अतां न बहु बोलतां तव पदांबुजा वंदितो ।
पडो विसर ना कदा मदिय हेंचि मी मागतों ।
तुम्ही वरद आपुला कर धरा गणूच्या शिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।८।।

|| श्रींचे गादी समोर होणारी सायं. आरती ||

।। श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।

ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया ।।धृ।।
आवरी जगन्मोहिनीला । दावी चिन्मय स्वरूपाला ।।
देई सद्बुध्दी मजला । प्रेमे तव यश गाण्याला ।।।।चाल।।

भक्तांकितां स्वामीराया, चरणी मी शरण ।।
करूनी भय हरण, दावी सुख सदन ।।
\अमित मम दोष त्यागुनीयां । विनवितो दास तुला सदया ।। १ ।।

जन-पदमुक्ति-पदान्याया । स्थली या अवतरला राया ।।चाल।।
ही जड मुढ मनुज-काया । पदीं तव अर्पियली राया ।।चाल।।
हे दिग्वसन योगीराया, नको मज जनन पुनरपि मरण, येत तुज शरण ।।
पुरवी ही आस संतराया । प्रार्थना हीच असे पाया ।। २ ।।

नेण्या अज्ञ-तमा विलया । अलासी ज्ञान रवी उदया ।।
करी तु ज्ञानी जनाराया । निरसुनी मोह – पटल माया ।। चाल ।।
गजानन संतराया असशी बळवंत । तसा धीमंत नको बघु अंत ।
विनवितो दास तुम्हा राया । नका त्या दूर करू सदया ।।३।।

|| कापुरार्ती ||

जयजय कर्पूरगौरा । तारी जयजय कर्पूरगौरा ।।धृ।।

भस्म हे चर्चित निल गलांबर झल्लालती रूंडमाळा ।।
इंदु लल्लाटी शोभतसे कटी । गजचर्म व्याघ्रांबरा ।
शंभो जयजय कर्पूरगौरा ।।१ ।।

श्वेतासनी महाराज विराजित । अंकी बसे सुंदरा ।
भक्त दयाघन वंदिती चरण । धन्य तु लीलावतारा ।
शंभो जयजय कर्पूरगौरा ।। २ ।।

मतिमंद दीन झालो पदी लीन । पार करी संसारा ।
काशीसूतात्मज मागतसे तुज । द्या चरणी मज थारा ।।
शंभो जयजय कर्पूरगौरा ।।३।।

कर्पूरगौरं करूणावतारं । संसारसारं भुजगेंद्रहारं ।
सदा वसंतं हृदयारविंदे । भवं भवान्यासाहित नमामि ।।
मंदारमाला कपाल काय । दिगंबराय दिगंबराय ।।
नमः शिवाय नमः शिवाय ।। कर्पूर महादीप समर्पयामी ।।

|| मंत्रपुष्पांजली ||

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवः।। ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।। स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु । कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।। ॐ स्वस्ति । साम्राज्यं, भौज्यं, स्वाराज्यं, वैराज्यं, पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्त पर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात पृथिव्यै समुद्रपर्यान्ताया एकराळिति । तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्याऽवसन् गृहे ।। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।। तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।। ॐ पूर्ण ब्रह्माय धीमहि, तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।।

|| श्लोक ||

पिता माता बंधु तुजविण असे कोण मजला ।
बहू मी अन्यायी परि सकळहि लाज तुजला ।।
न जाणे मी कांही जप तप पुजा साधन रिती ।
कृपादृष्टी पाहे शरण तुज आलो गणपती ।।

|| श्लोक ||

(वृत्त-भुजंगप्रयात)
सदासर्वदा योग तुझा घडावा ।
तुझे कारणी देह माझा पडावा ।।
उपेक्षूं नको गुणवंता अनंता ।
रघुनायका मागणे हेचि आता ।।१।।
उपासनेला दृढ चालवावे ।
भूदेव-संतासि सदा नमावे ।
सत्कर्मयोगे वय घालवावे ।
सर्वामुखी मंगल बोलवावे ।।२।।

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *