वारा फोंफावला | Vara Phophavala Lyrics in Marathi

वारा फोंफावला | Vara Phophavala Lyrics in Marathi

वारा फोंफावला दरिया उफाळला
माझं ग तारूं कसं हांकारूं सजणे समिंदरांत?

लाटेवर लाट, पाठोपाठ
थयथय दरिया, नाचे कांठोकांठ
तुफानाची खुणगांठ

वार्‍यानं शीड करि फडाफडा
छातींत होई धडाधडा
माझी काय्‌ छाती नाय्‌ वल्हवायला !

हे बघ कललं उजवीकडं
क्षणांत झुकलं डावीकडं
फेंसाळ पाणी होडींत आलं थोडं थोडं

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *