विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

विठ्ठल विठ्ठल गजरी ।
अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥

होतो नामाचा गजर ।
दिंड्या पताकांचा भार ॥२॥

निवृत्ती ज्ञानदेव सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥३॥

हरि कीर्तनाची दाटी ।
तेथें चोखा घाली मिठी ॥४॥

Leave a comment

Your email address will not be published.