सुख अनुपम संतांचे – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

सुख अनुपम संतांचे – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

सुख अनुपम संतांचे चरणीं ।
प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे ॥१॥

तो हा महाराज ज्ञानेश्वर माउली ।
जेणें निगमावली प्रगट केली ॥२॥

संसारी आसक्त माया-मोह रत ।
ऐसे जे पतीत तारावया ॥३॥

चोखा ह्मणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ ।
वाचिता सनाथ जीव होती ॥४॥

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *