In this lyrics article you can read Kana Kavita Lyrics, with English Lyrics from category Kavita lyrics free.
या पोस्टमध्ये तुम्हाला Kana Kavita Lyrics, English Lyrics सोबत Kavita या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
Kana Kavita Lyrics
ओळखलत का सर् मला पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरति पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन
गंगामाई पाहुणि आलि गेली घरटयात राहुन
माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतित नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको माञ वाचली
भिंत खचली चूल वीझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी माञ ठेवले
कारभारणीला घेऊण संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बान्धतो आहे चिखल गाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरि मोडला नाहि कणा
पाठीवरती हात ठेउन नुसते लढ म्हणा.
I hope you liked Kana Kavita Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला Kana Kavita Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा