Pu La Deshpande Poems in marathi

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Pu La Deshpande Poems in marathi

मैत्री

मैत्री एक सोपी व्याख्या आहे..
‘रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं
असंही काहीच नाही;
पण मी तुला विसरणार नाही
ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव
असणं ही झाली मैत्री.’
शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी
बसणं महत्त्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी
माणसातलं माणूसपण जाणलं…..
अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा.
ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या…

मीपणा

‘एकदा मीपणा’ विकून पहा…..
‘जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समैजेल की किती फालतू गोष्ट
‘आपण इतके दिवस’ ‘बाळगत होतो…???’

‘बोलावे तर विचार करुन……
‘नाहीतर बडबड सगळेच करतात…..
“ऐकावे तर अंतःकरणातून……
‘आरोळी तर सारेच देतात….!’

‘टिपावं तर अचूक टिपावं…..
‘नेम तर सारेच धरतात…..
“शिकावं तर माफ करायला…..
‘राग तर सगळेच करतात….!’

‘खळगी भरावी तर उपाशी पोटाची…..
‘पोट भरुन तर सारेच जेवतात…..
‘प्यावे तर दुसऱ्याच्या दुःखाचे विष..
‘सुखाचे घोट तर सारेंच घेतात…!”

‘जगावं तर इतरांसाठी…..
‘स्वतःसाठी तर सगळेच जगतात…..
‘ठेवावा तर शत्रुवर पण विश्वास….
“घात तर सारेच करतात…!”

“दुःखामधे सुद्धा रहावं हसत “
वेळ तर सर्वांचीच येते…..
‘झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं
‘राख तर सर्वांचीच होते….

मी एकदा आळीत गेलो

मी एकदा आळीत गेलो
चाळ घेऊन बाहेर आलो
तोंडात भरली सगळी चाळ
मी तर मुलाखाचा वाचाळ ॥१॥

कधी पायांत बांधतो चाळ
उगीच नाचतो सोडून ताळ
वजन भारी उडते गाळण
पायांचीहि होते चाळण ॥२॥

गाळणे घेऊन गाळतो घाम
चाळणीमधून चाळतो दाम
चाळीबाहेर दुकान माझे
विकतो तेथे हंसणे ताजे ॥३॥

‘खुदकन हसू’ चे पैसे आठ
खो खो खो’ चे एकशे साठ
हसवण्याचा करतो धंदा
कुणी निंदा कुणी वंदा ॥४॥

कुणाकुणाला पडतो पेच
ह्याला कां नाही लागत ठेच?
हा लेकाचा शहाणा की खुळा?
मग मी मारतो मलाच डोळा ॥५॥

फोटोमधली तरुणी

माझ्या खोलीतल्या
फोटोमधली तरुणी परवाच
मला म्हणाली
‘मला चागंलेसे स्थळ
शोधून द्या ना – इथे
माझ्या जीवाला टांगल्यासारखं वाटतंय’

चायलेंज

अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा?
एकेकाळी रचीली ओवी । व्हाल का हो नवकवी?
मारे बोलवीला रेडा । रेघ बी. ए. ची ओलाडां!
तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी-गाणी
म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भितं
चालवून दावा जणी । एक नाटक कंपनी
बाप रखुमादेवीवरा । आमुचा चायलेंज स्विकारा

घुंघुंर

आणि मध्यरात्री…..
जेव्हा तारका खेळून दमल्या नव्हत्या
एकच सारमेय दूरवर भुंकत होता
त्या वेळी तुझे घुंघुंर ऐकू आले.
अधांराच्या दालनातून
तुझ्या घुंघूंराच्या नादाने रातकिडे दचकले…
पण मी नाही दचकलो…
मी काही रातकिडा आहे?

मी राहतो पुण्यात

मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या ‘ठाण्या’त.
इथल्या मंडईचे देखील विद्यापिठ आहे.
आणि विद्यपीठाची मंडई झाली आहे.
बोलणे हा इथला धर्म आहे
आणि ऐकणे हा दानधर्म आहे.
म्हणून पुण्यात वक्ते उपदेश करतात
आणि श्रोते उपकार करतात.

एक होती ठम्माबाई

एक होती ठम्माबाई
तिला सोशल वर्कची घाई रात्रंदिवस हिंडत राही
पण वर्क कुठे उरलेच नाही वर्क थोडे बाया फार
प्रत्येकीच्या घरची कार
नोकर शोफर बेरा कुक –
घरात आंबून चाललय सुख
घराबाहेर दुःख फार
करीन म्हणते हलका भार
कार घेऊन निघते रोज
हर एक दुःखावरती डोस
पाजीन म्हणतेः पिणार कोण?
सगळ्या जणींना करते फोन
11 ‘मला कराल का हो मेंबर?”
अय्या, सॉरी, राँग नंबर !”
‘सगळ्या मेल्या मारतात बंडल’
म्हणून स्वतःचेच काढते ‘ मंडळ ‘!

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment