Baby shower songs in marathi lyrics

Baby shower songs in marathi lyrics Dohale purava lyrics in Marathi डोहाळे पुरवा, मैत्रिणींनो झोपाळ्यावर बसवा ;डोहाळे पुरवा.. झोपाळा सजवा वेलींनी, गर्भवतीला झुलवा; डोहाळे पुरवा.. भरुनी चुडा हिरवा, शालूही ल्याले भरजरी हिरवा; डोहाळे पुरवा.. वेणीमधे मरवा खोवियला, आणवा चाफा हिरवा; डोहाळे पुरवा.. पहिल्या महिन्याला सुनंस येता थकवा सासुनी जाणुनी धीर दिला तीज बरवा तिसर्‍या महिन्याला… Continue reading Baby shower songs in marathi lyrics

Ghadyalat vajle ek marathi kavita lyrics

ghadyalat vajle ek marathi kavita lyrics Ghadyaal Wajla Ek Lyrics in Marathi घडाळ्यात वाजला एक , बाउन्स झाला चेक , कॅच केला कॅश केला , मी नाही अभ्यास केला ! घड्याळात वाजले दोन , एडुकेशन लोन ! अभ्यास केला असता तर , पैसा नसता गेला । सॉरी सॉरी , ओह पप्पा ! अभ्यास केला नो… Continue reading Ghadyalat vajle ek marathi kavita lyrics

नुकतें होतें नजरेंत तुझ्या Lyrics in Marathi

नुकतें होतें नजरेंत तुझ्या दिसूं लागलें अवखळ पाणी; नुकतीं होतीं तुझ्या जिभेवर नांचु लागलीं अल्लड गाणीं; नुकते होते सुरू जाहले लाजेचे पदराशी चाळे; नुकते नकळत वितळत होते भाव निरंकुश साधेभोळे; नुकतें नुकतें होतिस शिकलिस ओठ दाबण्या दांतांखाली ! नुकत्या नुकत्या मीही होतों जुळवित पहिल्यावहिल्या ओळी ! पहिल्यावहिल्या त्या ओळींतिल कुणासही नच कांहीं रुचतें; आठवतां पण… Continue reading नुकतें होतें नजरेंत तुझ्या Lyrics in Marathi

मी गातों नाचतों आनंदें Lyrics in Marathi

मी गातों नाचतों आनंदें । वेडा झालों मी तव छंदें ॥१॥ गाइन ओविया पंढरीचा हा देव । आमुचा तो पांडुरंग ॥२॥ तुका म्हणे माझा सखा पांडुरंग । गाइन गोड मी हरिचें गीत ॥३॥ गीत – गो. ल. आपटे संगीत – पंडितराव नगरकर स्वर – पंडितराव नगरकर नाटक – संगीत देहूरोड गीत प्रकार – नाट्यसंगीत

रे हिंदयुवका ये पुढे Lyrics in Marathi

रे हिंदयुवका ! ये पुढे, चल ये पुढे, चल ये पुढे नव हिंदवी सेनाशतें वघ चालली विजयाकडे ये स्वर्ग हातीं आपुल्या पडला जरी रणि देह ही जिंकिता भोगावया ही सापडे तुजला मही सांगते गीता तुझी तुज शस्‍त्र घे करि संगरा अरिकंदना करि वंदुनी योगेश्वरा यदुनंदना घनगर्जती तोफांतुनी चेतावणीचे चौघडे धरी धीरता वरिवीरता रणचातुरी चल ये… Continue reading रे हिंदयुवका ये पुढे Lyrics in Marathi

चले जाव चले जाव Lyrics in Marathi

चले जाव, चले जाव, चले जाव ! हिंदुस्थान माझा देश माझा प्यारा भारत देश मालक मी या भूमीचा माझी शेते, माझे डोंगर माझी गंगा, माझा सागर हिमालयाच्या शिखरावरुनी सांगुं जगाला सार्‍या गर्जुनि खबरदार जर इथे याल तर सांडतील रक्ताचे सागर तुम्ही-आम्ही भाई-भाई भारतमाता आमुची आई बच्चे आम्ही शूरांचे वारस आम्ही वीरांचे फौज आमुची चाळिस कोट… Continue reading चले जाव चले जाव Lyrics in Marathi

भाळी अर्धचंद्र माथी Lyrics in Marathi

भाळी अर्धचंद्र, माथी शुभ्र गंगा लिंपीले सर्वांगा चिताभस्म गळा सर्पमाळा, ल्याला व्याघ्रांबर शिव तो शंकर सत्य तोचि शंख शिंगनाद गर्जे शिवगण पायी भक्तजन ओळंगीती भोळा सदाशिव पावतो भक्तासी उद्धरी दीनांसी निलकंठ हर हर शंकर सांब सदाशिव सांब सदाशिव त्रिपुरारी हर हर शंकर सांब सदाशिव गीत – ग. दि. माडगूळकर संगीत – विठ्ठल शिंदे स्वर –… Continue reading भाळी अर्धचंद्र माथी Lyrics in Marathi

ही छुम छुम जलि Lyrics in Marathi

ही छुम छुम जलिं या नौका कशि जाइल पैलतिराला ? ही बावरली बाला चांद खुले गगनाला कुंजविहारी जणुं हासे धाऊनि ये प्रभु विनवि तुला गीत – गो. ल. आपटे संगीत – पंडितराव नगरकर स्वर – पंडितराव नगरकर नाटक – संगीत देहूरोड गीत प्रकार – नाट्यसंगीत

पुन्हा न येईल वेळ Lyrics in Marathi

अरे मोहना वरचेवर का जमतो ऐसा मी पुन्हा न येईल वेळ कधी ही पुन्हा न येईल वेळ सख्या ही पुन्हा न येईल वेळ आज वाहते पाणी झुळझुळ घे पिऊनी भरभरुनी ओंजळ परतुनी जेव्हा केव्हा येशिल अरे कदाचित रिता कोरडा आढळेल ओहोळ सूर लागला खिळले लोचन जुळल्या तारा उचंबळे मन फुले चांदणे पसरी मोहन अरे मोहना,… Continue reading पुन्हा न येईल वेळ Lyrics in Marathi

जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र (२) Lyrics in Marathi

जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय प्रियतम देश महान रुधिरामधुनी या मातीचा धगधगतो अभिमान लाव्हाच्या तप्त रसाने घातला जयाचा पाया सह्याद्री-सातपुड्यांनी घडवली जयाची काया संतांनी निजकरुणेने भिजवली जेथली माती अमृतास जिंके ऐशी लेखणी कवींच्या हाती घरट्यातुन रायगडाच्या घेताच झेप गरुडाने थरथरली शाही तख्ते धाकाने, प्राणभयाने मर्दाचे गाइ पवाडे सावेश शाहिरी गाणी पैंजणांसवे रुमझुमली शृंगाररसाची गाणी किति… Continue reading जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र (२) Lyrics in Marathi