निर्गुणाचे भेटी आलो – Sant Gora Kumbhar अभंगवाणी Lyrics in Marathi निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे । तंव झालों प्रसंगी गुणातीत ॥१॥ मज रूप नाहीं, नांव सांगू काई । झाला बाई काई बोलूं नये ॥२॥ बोलतां आपली जिव्हा पैं खादली । खेचरी लागली पाहतां पाहतां ॥३॥ ह्मणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी । सुखासुखी मिठी पडली… Continue reading निर्गुणाचे भेटी आलो – Sant Gora Kumbhar अभंगवाणी Lyrics in Marathi
Category: Sant Gora Kumbhar
निर्गुणाचा संग धरिला जो- Sant Gora Kumbhar अभंगवाणी Lyrics in Marathi
निर्गुणाचा संग धरिला जो- Sant Gora Kumbhar अभंगवाणी Lyrics in Marathi निर्गुणाचा संग धरिला जो आवडी । तेणें केलें देशोधडी आपणियासी ॥१॥ अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें । एकलें सांडिलें निरंजनीं ॥२॥ एकत्व पाहतां अवघें लटिकें । जें पाहें तितुकें रूप तुझें ॥३॥ ह्मणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा तुह्मा आह्मा ठावा कैंचे काय ॥४॥
केशवाचे भेटी लागलेंसे – Sant Gora Kumbhar अभंगवाणी Lyrics in Marathi
केशवाचे भेटी लागलेंसे – Sant Gora Kumbhar अभंगवाणी Lyrics in Marathi केशवाचे भेटी लागलेंसे पिसें विसरलों कैसें देहभान झाली झडपणी झाली झडपणी संचरलें मनीं आधीं रूप ना लिंपेची कर्मि ना लिंपेची धर्मी ना लिंपे जडधर्मी मुक्त पाप ह्मणे गोरा कुंभार सहजी जीवन्मुक्त सुखरूप अद्वैत झाले बाप