He Deva Tujhya Dari Lyrics in Marathi | हे देवा तुझ्या दारी आलो

He Deva Tujhya Dari Lyrics in Marathi | हे देवा तुझ्या दारी आलो

हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया

हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया मोरया मोरया मोरया

ॐकाराचं रूप तुझं चराचरामंदी
झाडं वेली पानासंगं फूल तू सुगंधी
भगताचा पाठिराखा गरिबाचा वाली
माझी भक्ती तुझी शक्ती एकरूप झाली
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया मोरया मोरया मोरया

आदि अंत तूच खरा, तूच बुद्धी दाता
शरण मी आलो तुला पायावर माथा
डंका वाजं दहा दिशी, गजर नावाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया मोरया मोरया मोरया

गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया
मोरया मोरया मोरया मोरया

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोटयानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
मोरया

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *